इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे): लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील मागील 3 वर्षांपासून फरार असलेल्या मोक्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी पेरणे (ता. हवेली) येथील टोलनाक्याजवळून ताब्यात घेतले आहे. ऋग्वेद जालिंदर वाळके (वय 23, रा. पेरणे, टोलनाक्याजवळ, पेरणे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 22) गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्यातील पाहिजे आरोपी ऋग्वेद वाळके हा पेरणे टोलनाक्याजवळ राहते घरी येणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्टाफसह जावून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी ऋग्वेद वाळके याने 2022 मध्ये आरोपीने इतर साथीदारांचे मदतीने जुन्या भांडणाच्या वादातून प्रथमेश कुमार शिंदे व त्याचे वडील कुमार शिंदे यांचा खून केला होता. सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याचे कलम वाढवण्यात आले होते. ऋग्वेद वाळके याच्यावर लोणीकंद शहर पोलीस ठाण्यात 3 तर शिक्रापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, संभाजी सकटे, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाने, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.