इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी केली.
दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सन 1983 पासून देण्यात येत असून, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक वा अन्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या पुरस्काराचे वितरण सोहळा 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार आहे.