Friday, June 6, 2025
Homeक्राईम न्यूजलॉजवर नेऊन 37 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा...

लॉजवर नेऊन 37 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात एका 40 वर्षीय नराधमाने 37 वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने अत्याचार करून महिलेचे फोटो व व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नारधमाचे नाव अद्यापही समोर आलेले नाही. आरोपी मागील २-३ महिन्यापासून पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. तसेच तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करीन… अशी धमकी आरोपीने पिडीत महिलेस दिली.

या धमकीने पीडिता महिला घाबरली. त्यानंतर आरोपीच्या गाडीत बसून महिला लॉजवर गेली. लॉजवर गेल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ दाखवून महिलेला त्याने ब्लॅकमेल केलं. “माझ्याशी लग्न कर नाही तर नग्न फोटो वडिलांना पाठवीन अशी धमकी दिली.

अखेर या नराधमाचा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments