इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : राज्य सरकारकडून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. योजनेअंतर्गत महिलांना गेल्या वर्षी जुलै पासून हप्ता देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेतून गरीब महिलांना आर्थिक मदत केली आहे.
ही योजना सुरु झाल्यानंतर मात्र, राज्यात विरोधकांकडून यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या योजनेमुळे सरकार कर्ज काढत असल्याचा देखील आरोप विरोधकांनी केला होता. तसेच ही योजना फक्त निवडणूकांपुरतीच असून, लवकरच बंद होणार असल्याचंही विरोधकांनी म्हंटल होत.
याचदरम्यान, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. इंदापूरमध्ये झालेल्या घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विकास निधीच्या विलंबासाठी “लाडक्या बहिणीं” जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, त्यांनी लगेच सारवासारव करत हळूहळू विकास होत असल्याचं पुढे म्हंटल. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.