इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
महाराष्ट्र : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात १,५०० चा मासिक हप्ता जमा होणार आहे. राज्य शासनाने मंगळवारी, सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार आहे.
यापूर्वी जुलै २०२५ पर्यंतच्या सर्व हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ऑगस्टचा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा महिलांना होती. परंतु, तांत्रिक कारणांमुळे आणि लाभार्थ्यांच्या पडताळणी प्रक्रियेमुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला. सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस उलटूनही मागील महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने काही महिलांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता सरकारने निधी जारी केल्याने लाभार्थ्यांना लवकर हप्ता मिळणार आहे.
दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित जमा होईल अशी अपेक्षा महिलांना होती. मात्र, सरकारने ऑगस्टचा हप्ता स्वतंत्रपणे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच महिलांना सप्टेंबरचा हप्ता पुढील काही दिवसात मिळू शकतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० देते, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते.