Friday, August 1, 2025
Homeक्राईम न्यूजरिक्षाचालकाकडून पोलीस निरीक्षकावर दगडाने हल्ल्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल...

रिक्षाचालकाकडून पोलीस निरीक्षकावर दगडाने हल्ल्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवडः आळंदी शहरातील पीएमटी चौकात वाहतूकपोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात रिक्षाचालकाने पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्यावर रस्त्यावर पडलेला दगड उचलून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती अशी की, आळंदी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास जाणवतो. पीएमटी चौकातील पुलावर एका रिक्षाचालकाने रिक्षा उभी केल्याने वाहतूक खोळंबली होती. बस वळण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी रिक्षा पुढे नेण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने आदेश पाळण्यास नकार दिला. परिणामी, नांदुरकर यांनी त्याला चापट मारली. यानंतर संतप्त रिक्षाचालकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून नांदुरकर यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला.

ही संपूर्ण घटना काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओत पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर हे रिक्षाचालकाला समजावताना दिसत असून, त्यांनी नंतर त्याची माफीही मागितल्याचे दिसते.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाची रिक्षा जप्त केली असून, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments