Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजराहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, काय आहे...

राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयानेएका जुन्या प्रकरणात समन्स बजावले आहे. राहुल गांधी यांना २३ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यातआले आहेत. वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनीराहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला होता.इंग्लंडच्या दौऱ्यात मार्च २००३ साली राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादीविचारसरणीबाबत बदनामीकारक विधान केल्याचा आरोप वीरसावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केला होता.

वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३ रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना २३ ऑक्टोबर रोजी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सात्यकी सावरकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माझे आजोबा सावरकर यांचा जाणूनबुजून अवमान करत आहेत. लंडन येथे ५ मार्च २०२३ रोजी ओव्हरसिस काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी ओढूनताणून सावरकरांना मध्ये आणले आणि त्यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले. राहुल गांधी सावरकरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सावरकर आडनाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments