इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी रात्री नाना पेठमध्ये घडली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. घरगुती वादातून वनराज आंदेकर बंडु आंदेकरचा जावई आणि वनराजचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते.
गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर अॅसिड हल्ला केला होता. दरम्यान, आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने शहराच्या मध्य भागात घबराट उडाली.