Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजराज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी मद्यासह 76 लाख 55 हजारांचा...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी मद्यासह 76 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात मोठी कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण 76 लाख 55 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आदरवाडी गावाच्या हद्दीत, हॉटेल शैलेश समोरील पौड- माणगाव रस्त्यावर केली आहे.

याप्रकरणी जुल्फेकार ऊर्फ जुल्फेकार ताजअली चौधरी (वय 50, रा. हाऊस नं. 204, मोहल्ला नाली पाडा, मसूरी डासना आर. एस. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश याला अटक करून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गोवा राज्य निर्मीत व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरीता परवानगी असलेल्या पोलंड प्राईड प्रिमियम कलेक्शन रिझर्व्ह व्हिस्की या बॅण्डच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 33 हजार 600 सीलबंद बाटल्या (700 बॉक्स) वाहनात आढळून आल्या. तसेच मद्याची वाहतूक करण्याकरीता वापरलेला टाटा मोटर्स कंपनीचा सहाचाकी टेम्पो व मोबाईल फोन असा अंदाजे 76 लाख 55 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने जप्त केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक विराज माने, अतुल पाटील आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विराज माने करत आहेत, अशी माहिती पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments