इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
महाराष्ट्र : आज राज्यात पावसाचा जोर कायम राहील. हवामान विभागाने (IMD) राज्यभरात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे, विशेषतः कोकण, मुंबई आणि विदर्भ भागात. मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून, आजही पाऊस राहणार असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि मुंबईत मुसळधार पाऊस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज रिमझिम ते मुसळधार सरी पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून, पुढील २४ तासांत मुंबईत जास्त पावसाची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भात विजांसह पाऊस विदर्भ विभागात आज विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काही भागात ढगफुटीचा धोका असल्याने बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील काही वेळात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे नद्या-नाले भरून वाहून शकतात. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची भीती आहे.
एकूण राज्यातील परिस्थिती आज राज्यात ढगाळ हवामान राहील, आणि मुख्यतः पावसाची उघडीप असेल. पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव काळात पावसाचा असाच राहणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्शवभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केले आहेत.