Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजरांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी हेलिपॅड उभारावे; माजी आमदार अशोक पवार यांची...

रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी हेलिपॅड उभारावे; माजी आमदार अशोक पवार यांची मागणी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

न्हावरे, ता. 15: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील पंचतारांकितऔद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक विभागाच्या वतीने कायमस्वरूपी हेलिपॅड उभारावे, अशी मागणी माजी आमदार, अॅड. अशोक पवार यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

याबाबतच्या मागणीचे निवेदन माजी आमदार अशोक पवार यांनी आज (ता. 15) महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत हे रांजणगाव एमआयडीसीतील (MEPL) कंपनीमुळे प्रदूषित झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी आले होते.

रांजणगाव गणपती (पुणे) येथे आशिया खंडातील मोठी औद्योगिक वसाहत आहे. मात्र, याठिकाणी हेलिपॅडची सुविधा नाही. तसेच येथे अनेकवेळा केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार व वरिष्ठ पातळीवरील महत्त्वाचे पदाधिकारी औद्योगिक वसाहतीमध्ये भेटी देण्यासाठी किंवा विविध कार्यक्रमांसाठी येत असतात. परंतू, हेलिपॅड नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असते.

अशा मान्यवरांना पुणे विमानतळावरून खाजगी वाहनाने यावे लागते. दरम्यान वाघोली व शिक्रापूर महामार्गावर कायमच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येणाऱ्या मान्यवरांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे रांजणगाव एमआयडीसीमध्ये कायमस्वरूपी शासनाच्या औद्योगिक विभागाच्या वतीने शासकीय हेलिपॅड उभारावे. अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments