Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजमोर्चाआधीचं मनसे-सेनेचे नेते एकत्र; आझाद मैदानावर हिंदी सक्तीच्या 'जीआर'ची केली होळी

मोर्चाआधीचं मनसे-सेनेचे नेते एकत्र; आझाद मैदानावर हिंदी सक्तीच्या ‘जीआर’ची केली होळी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : हिंदी सक्तीवरून राज्यात राजकारण तापलं असून, ठाकरे आणि मनसे गटाचे नेते व कार्यकर्ते आता एकत्र आले आहेत. येत्या ५ जुलैला हिंदीविरुद्ध मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाभव्य मोर्चा काढणार असून, या मोर्चात उद्धव ठाकरेंचा पक्ष देखील सहभागी होणार आहे. दरम्यान, येत्या ५ तारखेला दोन्ही पक्ष युतीबाबत मोठी घोषणा करू शकतात अशी चर्चा देखील रंगली आहे.

मात्र, ५ जुलैच्या आधीच दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते आझाद मैदानावर आज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. आझाद मैदानावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची होळी केली आहे. या निषेधाचं नेतृत्व स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरेंसह मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी खासदार विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास देसाई आदी नेते उपस्थित होते.

शासनाने हिंदी सक्तीबाबत काढलेल्या ‘जीआर’ची होळी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आजचा कार्यक्रम केवळ झलक आहे, ५ तारखेचा महाभव्य मोर्चा असेल, जो महाराष्ट्र बघणार आहे. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही मोर्चाच्या माध्यमातून शासनावर दबाव आणू इच्छित नाही. मुळात आम्ही शासनाचा अध्यादेश स्वीकारतच नाही. शासन एखादी गोष्ट मराठी माणसांवर लादणार असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही. आम्ही शासनाच्या निर्णयाची होळी केली आहे, त्यामुळे आता आमच्यासाठी तो शासन निर्णय नाही. हिंदीचा सक्ती आम्ही होऊ देणार नाही.’ असं ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments