इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षीच कंपन्यांनी दर वाढवले होते. दरम्यान, पुन्हा एकदा १० ते १२ टक्क्यांनी दर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत नव्या दर लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्यात देशातील मोबाईल ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग करण्याचा विचार सुरू केला आहे. गेली २९ महिन्यांतील सर्वाधिक वाढ झाली असून ७.४ दशलक्ष (७४ लाख) नव्या युजर्सची नोंद मे महिन्यात झाली आहे.
भारतातील एकूण सक्रिय (अॅक्टिव्ह) युजर्सची संख्या आता १०८ कोटींवर पोहोचली आहे. या वाढीमुळे कंपन्यांना दरवाढीसाठी एक योग्य संधी मिळाली आहे. अहवालानुसार, डेटा प्लॅनच्या मयदितही कंपन्या बदल करणार आहेत. टेलिकॉम कंपन्या “टायर्ड प्राइसिंग” चालू झाल्यास ग्राहकांना एका मर्यादनंतर अतिरिक्त डेटा वापरल्यास अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
गेल्या महिन्यात वाढलेल्या ७४ लाख युजर्सपैकी जिओमध्ये ५.५ दशलक्ष युजर्स फक्त जोडले गेले आहेत. यामुळे जिओचा सक्रिय युजर शेअर आता ५३% वर पोहोचला आहे. तर, एअरटेलने १.३ दशलक्ष नवीन युजर्स जोडून आपला वाटा ३६% पर्यंत वाढवला आहे. व्होडाफोन आयडियाच्या ग्राहक संख्येत सातत्याने घट होत आहे. दरम्यान, स्वस्त आणि लहान डेटा पॅक्स बाजारात आणण्याचीही तयारी कपन्यांनी सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना पर्याय मिळतील पण त्यावर अधिक खर्च करावा लागेल, पण दरवाढीमुळे अनेक ग्राहक ‘पोर्टिंग’चा (कंपनी बदलण्याचा) पर्याय निवडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.