इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमानदुर्घटनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एअर इंडियाच्या एआय १७१ विमानातील सर्वच्या सर्व २४१ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व २४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून एक प्रवासी बचावला असल्याची माहिती मिळत आहे. बचावलेल्या प्रवाशावर उपचार सुरु आहेत. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलिनर ७८७हे विमान अहमदाबादवरुन लंडनकडे निघालं होतं.
या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकसंख्येच्या वस्तीच्या भागात जाऊन कोसळले. या विमानात १२ क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी प्रवास करत होते.
मृतांमध्ये खासदार तटकरेंचे नातेवाईकांचा समावेश…
मिळालेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर्समध्ये मुंबईच्या अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनाग्रस्त विमानात १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, ७ पोर्तुगालचे आणि १ कॅनडाचा ते एकूण २४२ नागरिक होते. दुर्दैवाने २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण देश शोकाकुळ झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला.