इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी मुंबई : राज्यात डान्सबारवर बंदी असताना देखील राज्यातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार चालवले जात असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी मध्यरात्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी येथील अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली आहे.
‘द रेस’ अस धाड टाकलेल्या डान्सबारचे नाव आहे. यावेळी बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये बारगर्ल अश्लिल नृत्य करत असल्याचे समोर आले. यावेळी बारमधील 40 बारगर्ल आणि 6 वेटर्सवर एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी, राज्यातील बेकायदेशीरपणे सुरु असलेले डान्स बार तात्काळ बंद करावेत. अन्यथा कडक करावाई करण्यात येईल. असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.