Friday, August 1, 2025
Homeक्राईम न्यूजमुलं शाळेत गेल्यांनतर बापानं उचललं टोकाचं पाऊलं; वाहतूक पोलिसाने राहत्या घरी गळफास...

मुलं शाळेत गेल्यांनतर बापानं उचललं टोकाचं पाऊलं; वाहतूक पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन संपवलं जीवन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, त्यांनी हे पाऊल का उचलेल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आठवड्याची सुट्टी असल्यामुळे घरीच होते. त्यांच्या पत्नी दौंडला गेल्या होत्या. तर त्यांची दोन मुलं शाळेला गेली होती. घरात कोणीच नसल्याचं पाहत त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांनी दार ठोठावला. मात्र, कुणीच दार उघडले नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले. त्यानंतर पोलिसांना गायकवाड हे दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांच्या पत्नीला दिली त्यानंतर त्यांनी तातडीने घराजवळ धाव घेतली. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, गायकवाड यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून त्या गायकवाड यांना फोन करत होत्या. मात्र, त्यांनी कॉलला काही प्रतिसाद दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments