Saturday, September 14, 2024
Homeक्राईम न्यूजमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर हद्दीत घडली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण किरकोरळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना तात्काळ खोपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अपघातामधील दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments