इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मित्राला पळवून लावल्याच्या गैरसमजातून चार जणाच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी पाईप, दगडाने मारहाण करुन त्याच्या नाकाच्या बाजूचे हाड फॅक्चर करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना नागपूर चाळीतील घोरपडे गिरणीसमोर २१ जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सुनिल नायर हिंदु (वय २३ वर्ष, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजहर, बाबा खानचा मुलगा, असद सय्यद आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात असताना आरोपींनी संगनमत करुन त्यांचा रस्ता अडविला. त्यांचा मित्र शिवम थोरात याला त्यांनी पळवून लावल्याच्या गैरसमजातून सुनिल यांना लोखंडी पाईप, दगडांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या गालावर, डोळ्याच्या खाली व नाकाच्या बाजूला असलेले हाड फॅक्चर झाले. तसेच त्यांना इतर ठिकाणी मारहाण करुन जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.