Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजमाजी आमदार बापूसाहेब पठारे तुतारीच्या प्रचारात, तर जयंत पाटील भाजपच्या माजी नगरसेवकांच्या...

माजी आमदार बापूसाहेब पठारे तुतारीच्या प्रचारात, तर जयंत पाटील भाजपच्या माजी नगरसेवकांच्या घरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडगावशेरीः सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार, असा प्रचार करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे इच्छुक माजी नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि. ९) रात्री भेट दिली. यावेळी जयंत पाटील यांच्या सोबत ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रकाश म्हस्के हे देखील उपस्थित होते. वडगावशेरी मतदारसंघ राष्ट्रवादी की शिवसेनेकडे जाणार, हे निश्चित नसताना तुतारी हातात घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामध्ये माजी आमदार बापूसाहेब पठारे, अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, सुरेंद्र पठारे, सुनील खांदवे-मास्तर, भीमराव गलांडे, रमेश आढाव ही मंडळी प्रयत्न करीत आहेत.

तर, विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून आपली उमेदवारी पक्की मानत गाठी-भेटी सुरू ठेवल्या आहेत. तर, महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा भाजपला मिळणार असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार जगदीश मुळीक यांना आहे. तेदेखील मंडळांना भेटी देताना आपल्याला आशीर्वाद मिळावा, असे साकडे गणरायाबरोबर जनतेला घालत आहेत. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे म्हणाले की, मी या अगोदर राष्ट्रवादीत असल्याने माझे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी जुने संबंध आहेत. ते गणेश मंडळांना भेटीगाठी देण्यासाठी येणार असल्याने मी त्यांना घरी येण्याची विनंती केल्याने ते घरी आले होते. मात्र, मी भाजपमध्येच राहणार असून, कोणीही संभ्रमावस्था करून घेऊ नये. भाजपमधूनच निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments