Wednesday, September 3, 2025
Homeक्राईम न्यूजमाऊलींच्या भक्तांना दिलासा; आळंदीपर्यंत होणार पुणे मेट्रोचा विस्तार

माऊलींच्या भक्तांना दिलासा; आळंदीपर्यंत होणार पुणे मेट्रोचा विस्तार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्याच्या मेट्रोचे विस्तारीकरण करत सर्व नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल आहे. नुकतीच त्यांनी मोठी घोषणा करत लोहगाव ते आळंदीपर्यंत मेट्रो लाइन जोडण्यात येणार असल्याचं म्हंटल आहे.

लोहगाव ते आळंदीपर्यंत मेट्रो लाइन जोडण्याच्या योजनेवर मागील आठवड्यातच महा-मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा झाली होती. या चर्चेत मेट्रो विस्ताराचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचित करण्यात आले. याबाबत माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनीही पत्र सादर केले असून, त्यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधिस्थळापर्यंत मेट्रो कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

रविवारी (दि. 31) विश्रांतवाडी येथे खासदार जनसंपर्क सेवा अभियान संपन्न झाले. या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, ‘आळंदी हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्रातील लाखो भाविक तेथे येतात. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातून भाविकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच त्यांना प्रवास सुलभ होईल, यासाठी आळंदीपर्यंत मेट्रो विस्तारण्याचा विचार निश्चित केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments