इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरातून एकधक्कादायक घटना समोर येत आहे. एका ७३ वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या ७३ वर्षीय महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून, महिलेचे प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जातआहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेवर तिच्या नातवानेच हल्ला केला असल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरातील एका ७३ वर्षीय महिलेवर तिच्या नातवाने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. लिलाबाई रघुनाथ विसपुते असं या महिलेचं (वय ७३, रा. जळगाव) नाव असून, त्या आपल्या मुलीकडे राहायला आल्या होत्या. छोट्याशा वादातून नातवाने आजीवर २६ जून रोजी दुपारच्या सुमारास घरातील कुऱ्हाडीने डोक्यावर नऊ वार करून गंभीर जखमी केले. नातवाचे नाव तेजस पोतदार असे आहे.
आजीने शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणे बंद कर असं सांगितल्याने नातवाने त्या रागात तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले व स्वतःच्याच आजीला गंभीर जखमी केले. त्यांनंतर आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेजसला वाचण्यासाठी घरात अज्ञात मारेकरी आल्याचा बनाव कुटूंबाकडून रचण्यात आला. मात्र, पोलीस तपासात सकाळी आजी-नातवामध्ये झालेला वाद, भावाने तेजसच्या हातात बघितलेली कुऱ्हाड आणि घटनास्थळावरील पुरावे यामुळे तेजवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या चौकशीत तेजसने आपला गुन्हा देखील कबुल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.