इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महापालिकेवर बेकायदेशीरपणे वीज वापरल्याप्रकरणी महावितरणकडून 4 लाख 14 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही वीज चोरी गेल्या सात वर्षांपासून होत असल्याचा खुलासा महाविकास आघाडीच्या सदस्यांनी केला आहे. तरी देखील महापालिकेला फक्त एका वर्षाचा दंड लावल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमधील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख अक्षय जैन, यांच्यासह बाकीच्या सदस्यांनी मिळून याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. ज्यात वीज चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वीज चोरी गेल्या 7 वर्षांपासून होत होती पण दंड फक्त एका वर्षांचाच का घेण्यात आला. याबाबत विचारणा केली असता महापालिकेच्या शिक्षण विभागाने जेव्हा पाहणी केली तेव्हा यात सात एसी आढळले. मात्र, महावितरणने केलेल्या पाहणी व अहवालातून हे एसी गायब करण्यात आले. असे सांगण्यात आले.
याबाबत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला व मालमत्ता विभागाला प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘येथे व्यायामशाळा व अभ्यासिका चालवण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या 7 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे आणि तो लपून कसा राहिला हा प्रश्न आहे.’
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी याला संरक्षण दिल्याने गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण दडून राहिले असून या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा व योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.