Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजमहापालिकेच्या वाहनतळात जुगाराचा अड्डा; ३४ जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

महापालिकेच्या वाहनतळात जुगाराचा अड्डा; ३४ जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः शहराच्या मध्यभागी असलेल्या महापालिकेच्या पार्किंगमध्ये जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाई करत या ठिकाणाहून ३४ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये जुगार खेळणाऱ्या ३३ आणि जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे. या प्रकरणी विजय बाबुराव महाडिक (रा. डेक्कन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलिसांनी पहाटे ६ वाजता छापा टाकला. वाहनतळाच्या शेवटच्या मजल्यावर एका शेडमध्ये हा जुगार सुरू होता. नारायण पेठेतील महापालिकेच्या हरिभाऊ साने वाहनतळात हा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात १ लाख ६० हजार रुपयांची रोकड आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करत आहेत. महापालिकेच्या जागेतच अशाप्रकारे जुगार सुरू असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments