इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : खराडी परिसरातील एका मसाज पार्लरमधील तरुणीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन व्यवस्थापकाने तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
हितेशकुमार मेहरा (वय २२, रा. राजस्थान) हे अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे आहे. यासंदर्भात एका तरुणीने फिर्याद नोंदवली आहे. फेब्रुवारी महिन्यात हे मसाज पार्लर सुरु झाले. तेव्हापासून मेहरा हा तेथे व्यवस्थापक म्हणून काम करतो. पीडित तरुणी महिनाभरापूर्वी पार्लरमध्ये कामाला लागली. २९ सप्टेंबर २०२४ ला रोजी मसाज पार्लरमधील खोलीत तरुणी एकटीच होती. त्यावेळी मेहरा तेथे आला व त्याने या तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.