इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूरः नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या मिनी आणि सातव्या चाइल्ड नॅशनल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथील सावी संतोष ताठे हिने उल्लेखनीय कामगिरी करत ब्राँझ पदक पटकावले.
सावीने दहा वर्षाखालील सेबर प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशभरातील एकूण ३२ स्पर्धकांमध्ये आठव्या क्रमांकाचे स्थान मिळवले. या उत्तम खेळीसह तिने राष्ट्रीय स्पर्धेत राज्यासाठी पदक मिळवण्याचा मान मिळवला आहे.
तिच्या या यशामध्ये काजी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्याने सराव, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षणामुळे सावीने ही कामगिरी साध्य केली.
सावीच्या या यशामुळे शाळा, शिक्षकवृंद, गावकरी आणि तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. बालवयात मिळालेले हे यश तिच्या भावी कारकिर्दीस निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत विविध ठिकाणांहून व्यक्त होत आहे.