Tuesday, November 26, 2024
Homeक्राईम न्यूजमध्यरात्री घरात घुसले; अज्ञात चोरट्यांची महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी, शिरुर...

मध्यरात्री घरात घुसले; अज्ञात चोरट्यांची महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी, शिरुर तालुक्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

न्हावरे : शिरुर तालुक्यातील गुनाट येथील परिसरातील करपे वस्ती येथे अज्ञात चार जणांच्या टोळक्याने महिलेला चाकूचा धाक दाखवून, धारदार हत्याराने महिलेचा काम कापला आहे. कान कापून कानातील सोन्याचे झुबे, मंगळसूत्र, कानातील वेल व रोख रक्कम असा एकूण सुमारे 63 हजार रुपयांचा ऐवज जबरी मारहाण करून चोरून नेला आहे. ही घटना सोमवार (दि. 25) रोजी रात्री 1.30 च्या सुमारास घडली आहे. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सोपान करपे (वय-48, रा. गुनाट, करपेवस्ती, शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सुन कल्पना, मुलगा आत्माराम, सुन ज्योती व नांतवडासह गुनाट परिसरातील करपे वस्ती येथील रहिवाशी आहेत. ते शेती करुन कुंटुंबाची उपजिवीका करतात. सोपान करपे हे आळंदी येथे पायवारी करण्यासाठी गेले असल्याने (दि.25) रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा ओढुन झोपल्या होत्या. तसेच शेजारच्या खोलीत त्यांची दोन मुले झोपली होती. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेले चार अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरुन काढले. त्यावेळी त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यातील एका इसमाने त्यांचे तोंड दाबले आणि त्यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या गळ्याला चाकु लावून गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र काढुन घेतले.

पण कानातील सोन्याचे झुबे व वेल काढता येत नसल्याने चोरांनी कोणत्या तरी धारदार हत्याराच्या साह्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजुने कापुन झुबे व वेल काढुन घेतले. तसेच पेटीतील तीन हजारांची रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. दरम्यान, शेजारी खोलीमध्ये झोपलेल्या मुलांकडे सुमन करपे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी ती कडी काढली आणि मुले व सुना बाहेर आल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र व आत्माराम त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात घेवुन गेले.

या दरोड्यात सोन्याचे मणी मंगळसुत्र, कानातील सोन्याचे झुबे व वेल आणि 500 रुपयाच्या 6 नोटा अशी एकूण 63 हजार रुपयांची चोरी झाली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरी हे करत आहेत. या घटनास्थळी पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments