इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खडकवासला : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान वव्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत व उपविभागीय कृषी अधिकारी पुणे, तालुका कृषी अधिकारी हवेली, मंडळ कृषी अधिकारी हवेली यांचे मार्गदर्शनाखाली मौजे मणेरवाडी येथे दिनांक 17 जुलै 2025 रोजी रेशीम शेती व्यवस्थापन या विषयावर जिल्हा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले व केंद्रीय रेशीम उद्योग शास्त्रज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी तुती लागवड व रेशीम उत्पादन या संबंधि मार्गदर्शन केले.
उप कृषी अधिकारी सरकाळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना सांगितल्या. पंचायत समितीच्या श्रीमती विद्या चोरगे यांनी बांबू लागवडीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गावाच्या माजी सरपंच रुपाली निलेश जाधव, विद्यमान उपसरपंच मनीषा जावळकर, प्रयोगशील युवा शेतकरी प्रविण जाधव, कृषी मित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाचा कर्मचारी वृंद सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मेघा राठोड, महेश राऊत, विशाल ढोरे, श्रीमती मधुरा रासकर उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या व न परवडणाऱ्या शेतीला एक पर्याय व जोडधंदा म्हणून फळबाग लागवड, बांबू लागवड, तुती लागवड (रेशीम शेती) कशी फायद्याचे ठरू शकते हे यावेळी सांगण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती एम.डी. गवळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.