Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजभोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु

भोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर : येत्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा भोर मतदार संघातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या मागे ठाम राहतील. तसेच भोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु, असा विश्वास तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भोर तालुक्यातील वेळु-भोंगवली व नसरापूर-भोलावडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांची सभासद नोंदणी आढावा बैठक भोर तालुक्यातील वरवे येथे रविवार (दि. 15 सप्टेंबर) पार पडली. यावेळी गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, कुठलाही एक माणूस भोर तालुक्यात चालू शकत नसून एक लाख मतदान जरी त्याला पडले तरी ते एकट्याचे नसल्याचे शवसैनिकांनी लोकसभेत दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेवा संघटनेचे काम आपल्याला सर्व शिवसैनिकांच्या ताकदीने वाढवायचे असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. लोकसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदार संघात पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिकांने काम करत मोठे मताधिक्य दिले आहे.

यावेळी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, तालुका संघटक दशरथ गोळे, तालुका संघटिका निशा सपकाळ, तालुका समन्वयक भरत साळुंखे, तालुका युवासेना प्रमुख अनिकेत शिंदे, तालुका उपसंघटिका राणी मांढरे, रुपाली पडवळ, विभाग प्रमुख विजय सावंत, एकनाथ तावरे, माजी तालुका प्रमुख पोपट जगताप, बाळासाहेब सुतार, निलेश भांडे, जनार्दन हारपुडे तसेच आदी पदाधिकारी व जुने शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments