इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भोरः भोर तालुक्यातील पांडे गावात मध्यरात्री किरकोळ वादातून दगडफेक करून एका तरुणाला दुखापत केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित अशोक साळुंखे याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. फिर्यादी सुरज कोंडीबा साळुंखे यांनी तेव्हा भांडण सोडविले होते. मात्र, नंतर रात्री उशिरा पुन्हा वाद झाल्याचे जीवन टापरे व साहिल साळुंखे यांनी फोनवरून कळवले.
त्यामुळे सुरज साळुंखे हे भैरवनाथ मंदिरासमोर गेले असता, आरोपी प्रशांत ज्ञानेश्वर साळुंखे हा दगड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने दगड कानावर मारून त्यांना दुखापत केली, अशी फिर्याद पोलिसांत करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तपास पोलीस हवालदार निबांळकर करत आहेत.