इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वाघोली, (पुणे): भावडी येथील कंजारभट वस्ती येथील पाच नंबरपरिसरात सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट-6 च्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून सुमारे 1 लाख 16 हजार रुपयांचे कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई युनिट-6 चे अधिकारी व अंमलदार अवैध धंदे प्रतिबंधक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. निर्मला विनोद गुदडावत (वय 36, रा. कंजारभाट वस्ती, भावडी, ता. हवेली) ही महिला दारू तयार करत असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन आणि साहित्य आढळून आले.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), (फ), (ब), (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) मा. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकातील नेहा तापकीर, गिरीश नाणेकर, प्रशांत कापुरे, सारंग दळे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कारवाई केली आहे.