Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजभाजपची खेळी; निवडणुकीत मुंबई- ठाण्यात एकनाथ शिंदेंची तर पुण्यात अजित पवारांचीं कोंडी...

भाजपची खेळी; निवडणुकीत मुंबई- ठाण्यात एकनाथ शिंदेंची तर पुण्यात अजित पवारांचीं कोंडी करणार?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांसह आता भाजपने देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकत्याच आटोपलेल्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकांमधील चर्चेसंदर्भातील माहिती समोर आली आहे. या बैठकांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपने चाचपणी सुरु केली आहे.

आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घेण्यात आला. यानुसारच आता भाजपा स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या चाचपणीनंतर आणि पक्षांतर्गत चर्चेनंतर भाजपाने खरोखरच स्वबळाचा नारा दिल्यास मुंबई ठाण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर पुण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी अशा लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान निवडणुकीसाठी मंत्री अमित शाह यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलचे संकेत दिल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments