Saturday, September 13, 2025
Homeक्राईम न्यूजबोरीभडक येथील युवा उद्योजक जीवन आतकिरे यांचे अल्पशा आजाराने निधन

बोरीभडक येथील युवा उद्योजक जीवन आतकिरे यांचे अल्पशा आजाराने निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत, (पुणे); बोरीभडक (ता. दौंड) येथील युवा उद्योजक जिवन विलास आतकिरे (वय 38) यांचे आज सोमवारी (ता. 08) सकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगी, असा परिवार आहे.

जिवन आतकिरे यांनी अल्पवयात बांधकाम व प्लॉटिंग व्यवसायात नाव कमावले होते. अत्यंत हसऱ्या शांत व संयमी स्वभावाचे असणारे जीवन मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे बंधू विकास व पत्नी निकिता यांनी मुंबई, चेन्नई, पुणे अशा विविध शहरात त्यांच्यावर उपचार व्हावे यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, त्यांच्या जाण्याने बोरिभडकसह उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बोरिभडक येथील समशानभूमीत आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments