इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः येरवड्यातील गुंजन चौक परिसरात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोप्या सरकार ऊर्फ सोपान रामेश्वर सावंत (वय २३, रा. गांधन खिळा वस्ती, फुरसुंगी) असे आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हेगाराच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कशी रचली सापळ्याची रणनीती?
पोलिस अंमलदार अमोल गायकवाड आणि विशाल निलख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गुंजन चौक परिसरात एक गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार प्रभारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार गायकवाड, निलख, वाबळे, आणि जायभाय यांनी परिसरात सापळा रचला आणि सावंतला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून अंदाजे ३१,००० किमतीचे गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, विजय ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार व त्यांच्या टीमने केली.