Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजबीड मधील सरकारी वकिलानं कोर्टातच गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रकरणाला नवं वळण;...

बीड मधील सरकारी वकिलानं कोर्टातच गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रकरणाला नवं वळण; न्यायाधीशावर गुन्हा दाखल…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीड : दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली होती. सरकारी वकील विनायक चंदेल यांनी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात मोठा द्विस्ट समोर आला असून, चंदेल यांची सुसाईट नोट पोलिसांना मिळाली आहे.

बुधवारी (२० ऑगस्ट) विनायक चंदेल यांनी बीडमधील वडवणी येथील स्थानिक न्यायालयाच्या खिडकीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलीस आत्महत्येमागचं कारण शोधत असताना त्यांच्या हाती चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईट नोट लागली. या सुसाईड नोटच्या आधारे आणि कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि अन्य एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.

कुटूंबाने काय आरोप केले आहेत?

चंदेल कुटुंबाने आज वडवणी पोलिसांची भेट घेतली, विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांनी पोलिसांना सांगितले की, न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून त्यांना वारंवार त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संबंधित न्यायाधीशाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पोलिस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत.

विनायक चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी दाखवलेली नाही. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहे. त्याबाबत सध्या माहिती समोर आलेली नाही. पोलीस आता या प्रकणात आणखी धागेदोरे शोधत असून, चंदेल यांनी आपल्या चिठ्ठीत काय लिहिलं आहे? याची लवकरच माहिती समोर येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments