Friday, June 6, 2025
Homeक्राईम न्यूजबारामती-भिगवण महामार्गावर ट्रक-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

बारामती-भिगवण महामार्गावर ट्रक-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भिगवणः बारामती-भिगवण राज्य महामार्गावर गुरुवारी (दि.5) रोजी रात्री नऊच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय बबन आव्हाड (रा. खानापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण अक्षय आव्हाड हा बारामती अॅग्रो कारखाना येथे त्याच्या नातेवाईकाच्या कन्स्ट्रक्शन साईटवर कामाला होता. रात्री आठ वाजता काम आटोपल्यानंतर शेटफळगडे येथून तो आपल्या दुचाकीवरून घरी निघाला, दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची (एमएच 12 एम व्ही 5562) व अक्षयच्या दुचाकीची (एम एच 12 आर एच 3746) समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत अक्षय याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला होता. तरुणास भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासातून मृत घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments