इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : बारामतीत रस्त्याच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढूलागली असून, आत्तापर्यंत अवजड वाहनांच्यामुळे अपघात होत होते. हे अपघात होऊ नयेत म्हणून जे स्पीड ब्रेकर तयार केले..! त्यावरून देखील एक अपघात झाला आहे… रात्री दहाच्या सुमारास बारामती शहरातील भिगवन रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकली आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा यात मृत्यू झाला.
बारामती भिगवण रस्त्यावर ऊर्जा भवननजीक हा अपघात रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. या घटनेत शरयू संजय मोरे या 22 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
शरयू मोरे ही तिच्या एका मैत्रिणीसह दुचाकीवरून शनिवारी रात्री बारामतीतून एमआयडीसी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाकडे निघाली होती. भिगवन रस्त्यावरील ऊर्जा भवन नजीक तिची दुचाकी आली असता, ऊर्जा भवन नजीकचा गतिरोधकाचा अंदाज तिला आला नाही आणि तिची दुचाकी डिव्हायडरला धडकली. यात दुचाकी चालवणाऱ्या शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची दुसरी मैत्रीण जखमी झाली.
शरयू ही वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होती. तिचे वडील सांगली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. पुढील एका वर्षात ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार होती. मात्र तोपर्यंत तिच्यावर काळाने घाला घातला.