इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपूर येथे दिनांक १५ जुलै रोजी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत बैठक, शिवव्याख्यान आणि ताणतणाव मुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सकाळी झालेल्या बैठकीत बारामती, कुरकुंभ, रांजनगाव, जेजुरी व इतर एमआयडीसीतील सुमारे ११५ उद्योजक सहभागी झाले. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी उपस्थित उद्योजकांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी ‘प्रतापगडचे युद्ध आणि शिवाजी महाराजांची युद्धनीती’ यावर व्याख्यान देऊन पोलीस दलाला प्रेरणा दिली.
शेवटी डॉ. संतोष मंगलाई व डॉ. सदाशिव मचाले यांच्या मार्गदर्शनाखाली ताणतणाव मुक्ती शिबिर घेण्यात आले. यात १५ पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमांना पोलीस अधीक्षक गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बिरादार, उपविभागीय अधिकारी राठोड, बरडे व दडस यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.