Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजबारामतीः खाजगी कोचिंग क्लास चालकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक

बारामतीः खाजगी कोचिंग क्लास चालकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती, (पुणे): बारामती शहरातील एका नामांकित खाजगी कोचिंगक्लास चालकाकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन अकबर पठाण (वय 31, रा. सूर्यनगरी, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खंडणीखोराचे नाव आहे. सोशल मीडियावर क्लास चालकाविषयी अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट करून क्लास चालकाला धमकी दिली होती. या प्रकरणी कोचिंग क्लास चालकाच्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी मोहसीन पठाण यास अटक केली असून, त्याला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर व परिसरात शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळे शाळा, कॉलेजेस तसेच खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. बारामती शहरातील भिगवण रोड या ठिकाणी चालू असलेल्या एका खाजगी कोचिंग क्लास विषयी मोहसीन पठाण याने वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर बदनामीकारक व अश्लील मजकूर पोस्ट केले होते. तसेच कोचिंग क्लास चालकास धमकी देऊन त्याचे कडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याविरुद्ध क्लास चालकाने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, आरोपी मोहसीन पठाण यास अटक करण्यात आले असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रूपाली पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments