इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी नांदायला येत नसल्याने तिच्या माहेरी जाऊन तिला घरी येण्यासाठी विनवणी केली. मात्र, यातून निर्माण झालेल्या वादाने एक टोक गाठले आणि यातून एक थरारक घटना घडली.
ममता प्रेम चव्हाण (वय २८) ही गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यापासून वेगळी राहत होती. मात्र, ममता तिच्या माहेरी न जाता मावशीकडे राहत होती. रविवारी पती प्रेम चव्हाण हा तिला परत घरी नेण्यासाठी आला होता. मात्र, यावेळी दोघांमध्ये मोठा वाद पेटला आणि या रागात प्रेमने ममताच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात ममताचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रेम चव्हाण तेथून पसार झाला. या घनेटची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व काही तासांत प्रेम चव्हाणला याला बेड्या ठोकल्या. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणात प्रेम विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे
या घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून, कौटुंबिक वाद किती गंभीर स्वरूप घेऊ शकतात, याची चर्चा सुरू झाली आहे.