Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजबलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला 25 वर्षाची शिक्षा

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला 25 वर्षाची शिक्षा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला 25 वर्षे सश्रम कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी राठोड यांनी हा आदेश दिला आहे. प्रभाकर सूर्यकांत पाटील असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रभाकर पाटील याच्यावर 376 (2) (E) (1), 354, पोस्को 5,6,7.8,10 प्रमाणे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे सुनावणी सुरु होती. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रिया देसाई / मोरे, आणि पठारे यांनी बाजू मांडली.

यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला दोषी ठरवून 25 वर्ष सश्रम कारावास 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष कारावास व पॉक्सो 12, मध्ये 02, वर्ष सक्षम कारावास व 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया गावडे यांनी तपास अधिकारी म्हणून गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. तर कोर्ट कर्मचारी म्हणून अविनाश गोसावी (पो. हवालदार), संभाजी म्हांगरे (पोलीस हवालदार) यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments