इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात वृद्ध नागरिकाला पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी फसवणूक केली आहे. “गणपतीचे दिवस आहेत, अंगावर दागिने घालू नका” असे सांगत बनावट पोलिसांनी वृद्धाची सोन्याची चैन व अंगठी रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले आणि क्षणात दागिन्यांसह पोबारा केला.
ही घटना बाबुराव नगर येथील रहिवासी बळीराम रामचंद्र इंदलकर (वय ६९) यांच्या बाबतीत घडली. ते घराजवळ उभे असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येत ओळखपत्र दाखवून “आम्ही पोलीस आहोत” असा विश्वास बसवला. त्यानंतर गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. बळीराम रुमाल काढत असतानाच आरोपींनी चैन व अंगठी लंपास केली आणि दुचाकीवरून पसार झाले.
याबाबत इंदलकर यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.