इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत : बनावटी नोटा बाळगणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अमितकुमार रामभाऊ यादव (वय 31, मुळ रा. भमारपुरा ता. जालेय जि. दरभंगा, बिहार सध्या रा. शालीनी कॉलेज, कोंढवा पुणे) व राकेश चंद्रशेखर यादव (रा. दरभंगा बिहार), असे आरोपींची नावे आहेत.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटस येथे एक व्यक्ती बनावट नोटा बाजारात पसरवण्यासाठी पुणे सोलापुर महामार्गावर असलेल्या पाटस येथील उड्डाणपुलाखाली घेवुन येणार असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे आहे त्या ठिकाणी सापळा रचून अमितकुमार यादव आणि राकेश यादव या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. यावेळी त्या आरोपींची झडती घेतली असता त्याच्यांकडे 500 रुपयाच्या 04 एन एम सीरीझ असलेल्या बनावट नोटांचे 3 बंडलमध्ये प्रत्येकी 100 नोटा प्रमाणे एकुण 300 नोटा असे 1,50,000 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. यावेळी यवत पोलीसांनी अमित यादव, राकेश यादव या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, भानुदास बंडगर, पोलीस हवालदार अक्षय यादव, विकास कापरे, हिरामण खोमणे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय टकले, गणेश मुटेकर यांच्या पथकाने केली.