इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील कर्वे रोडवर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, यात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. राजसिंग तमट्टा (वय २५, रा. कम्युनिटी कॅफे, कोथरूड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
२ जुलै रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता कर्वे रोडवरील नळ स्टॉप मेट्रो स्टेशनजवळून वेगाने दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट उड्डाणपुलाच्या कड्याला आदळली. या अपघातात राजसिंगच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर घोरपडी गावातील रहिवासी विनोद पिल्ले यांनी घटनेची माहिती तत्काळ अलंकार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजसिंगला जवळील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.