Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजप्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेचे घर बळकाविण्याचा प्रयत्न; वानवडीतील प्रकार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेचे घर बळकाविण्याचा प्रयत्न; वानवडीतील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागनाथ गुलाब शिंदे (वय-५४, रा. वानवडी) याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याचा विवाह झाला असून, त्याला दोन मुले आहेत. तक्रारदार महिलेशी शिंदेची ओळख झाली होती. त्या ओळखीतून त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो वानवडीतील महिलेच्या सदनिकेत राहू लागला. त्यानंतर त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. तसेच त्याने महिलेशी आळंदी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

विवाह झाल्यानंतर सुरुवातीला शिंदे चांगला वागला. त्यानंतर त्याने महिलेकडे पैशांची मागणी सुरू केली. महिलेने वाघोलीतील आईच्या नावावर असलेली जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला. जमीन व्यवहारातील पहिला हप्त्यापोटी मिळालेले दीड लाख रुपये तिने शिंदेला दिले. त्यानंतर त्याने महिलेच्या नावावर असलेली सदनिका बळाकाविण्याचा प्रयत्न केला.

तसेच सदनिकेची विक्री करून त्याने पैशांची मागणी करून महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चौकशीत शिंदे विवाहित असताना त्याने ही बाब महिलेपासून लपविल्याचे उघड झाले. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments