इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सांगली: सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव करिष्मा अमोल तुपे असून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
सचिनने करिष्माला लग्नाचे वचन दिले होते, मात्र, ऐनवेळी सचिनने करिष्माला धोका दिला आणि तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. सचिनच्या या निर्णयामुळे करिष्माला प्रचंड मानसिक धक्का बसला, दरम्यान, तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या प्रियकराचे नाव सचिन आबासाहेब तवर (वय २१) असे आहे.
तरुणीचे वडील अमोल केशव तुपे सचिन विरुद्ध गुन्हा दाखल केला असून याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस सध्या करत आहे.