Wednesday, September 3, 2025
Homeक्राईम न्यूजप्रशासनाला कारवाई करावीच लागेल'; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये

प्रशासनाला कारवाई करावीच लागेल’; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अटी-शर्तीचं उल्लंघन झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्ती केली असून, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनप्रकरणी सरकारची भूमिका सामंजस्याची आहे परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारला कारवाई करावीच लागते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात बोलत होते. सिंहगड रोडवरील फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत असताना मराठा आरक्षण आणि मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज पार पडलेल्या सुनावणीवर बोलताना म्हणाले, ‘आंदोलनप्रकरणी सरकारची भूमिका सामंजस्याची आहे परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारला कारवाई करावीच लागते.’

मंगळवारी दुपारी चारपर्यंत पाच हजार आंदोलकांशिवाय इतर आंदोलकांना मुंबईतून बाहेर पाठविण्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर त्याची अंमलबजावणी शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सूचित केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन आंदोलकांकडून झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आंदोलकांकडून रस्त्यावर ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यासंदर्भात देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असतो परंतु न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर शासन आणि प्रशासनाला ज्या प्रकारची कारवाई करायची असते ती कारवाई करेल.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments