Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजपुरंदर विधानसभा मतदारसंघाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीसाठी सुरुवात

पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीसाठी सुरुवात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बापू मुळीक / सासवड : पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरीताआज (दि. 22) पासून अर्ज स्वीकृतीसाठी सुरुवात झाली आहे. यावेळी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 29 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी 33 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या अर्जाची छाननी झाल्यानंतर ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. नामनिर्देशन अर्ज उमेदवार नामनिर्देशन व्यवस्थापन कक्ष येथून प्राप्त करून घेता येणार आहे. तसेच प्रत्येक नामनिर्देशन अर्जासाठी रुपये 100 इतकी फी आकारण्यात येणार आहे.

आज (दि. 22) दुपारी तीन वाजेपर्यंत 14 इच्छुक उमेदवारांमार्फत उत्तम गुलाब कामठे, दत्तात्रय मारूती झुरंगे, अनिल नारायण गायकवाड, संदिप ऊर्फ गंगाराम मारूती जगदाळे, चंद्रकांत शंकर भिताडे, शंकर बबन हरपळे, दिगंबर गणपत दुर्गाडे, उत्तम गुलाब काळे, जालिंदर सोपानराव कामठे, महादेव साहेबराव खेंगरेपाटील, सुरेश बाबूराव वीर, अतुल महादेव नागरे, उमेश नारायण जगताप, विशाल अरूण पवार यांनी 29 अर्ज नामनिर्देशन व्यवस्थापन कक्षामधून प्राप्त करून घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments