Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात मुसळधार पावसाचे 3 बळी, आजही अलर्ट जारी; पुढील 4 तास महत्वाचे

पुण्यात मुसळधार पावसाचे 3 बळी, आजही अलर्ट जारी; पुढील 4 तास महत्वाचे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विक्रमी पाऊस

गेल्या २४ तासांत दौंड, बारामती आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये विक्रमी पाऊस पडला आहे. बारामती तालुक्यात मे महिन्यात ५५ वर्षांचा विक्रम नोंदला गेला आहे, या भागात अभूतपूर्व पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत, इंदापूर आणि बारामती तालुक्यांतील १४३ घरे ओसंडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याने बुडाली आहेत.”> पुणेः पुणे जिल्ह्यात मान्सूनचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, नागरिकांना संभाव्य धोक्यांबद्दल इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत दौंड, बारामती आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये विक्रमी पाऊस पडला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत, इंदापूर आणि बारामती तालुक्यांतील १४३ घरात पावसाचे पाणी शिरले आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भामा आसखेड धरण येथे वीज कोसळून एका मच्छिमाराचा मृत्यू झाला, तर दौंडमध्ये भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. कर्वेनगर परिसरात झाडाची फांदी डोक्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बारामतीतील नरोली येथे एका गायीचाही मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments