इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड सनी जाधव व त्याच्या साथीदारांविरुद्ध मंगळवारी (दि. १५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रवन वसाहत, बिबवेवाडी), सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण (वय १९, रा. पवळे चौक, कसबा पेठ), शक्ती गुरव (रा. लातूर) ही मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
जाधव व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे, लूट, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.