Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पुन्हा खळबळ...! गणेश विसर्जनादरम्यान फिनिक्स मॉलच्या बाहेर गोळीबार

पुण्यात पुन्हा खळबळ…! गणेश विसर्जनादरम्यान फिनिक्स मॉलच्या बाहेर गोळीबार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाकड : सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलच्या बाहेरील रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरु महामार्गावरील फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7 जवळील डीपी रोडवर घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गालगत असलेल्या फिनिक्स मॉल गेट नंबर सात येथे काही काम सुरू आहे. सव्वा सहाच्या सुमारास चारचाकीतून आलेल्या अज्ञात व्यक्तीने अविनाश नावाच्या कामगाराला भेटून त्याच्यासोबत संवाद साधला. तो गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केला.

सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही. मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळीबार झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबार झाल्याबाबत एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. गोळीबार झाला की नाही? तसेच हा गोळीबार कोणी केला. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस तपास करीत आहे.

दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे. आधीच गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा शहरात दाखल झालेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments